नमस्कार,
सर्व प्रथम समाजातील तमाम समाजबांधवांना व हितचिंतकांना ''विश्वकर्मा सुवर्णकार समाज संचालित, युवामंच'' कार्यकारिणी तर्फे हार्दिक शुभेच्छा !
आपल्या समाजातील ज्ञातीबांधवांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करून त्यांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीने व आपल्या समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्यासाठी आपल्या समाजातील वरिष्ठांनी ''युवामंच'' ची स्थापना केली. या मागील मुळ उद्देश होता. तो नवीन युवा वर्गाला समाजातील रूढी परंपरा यांची माहिती व्हावी व आपल्या अंगी असलेल्या कला गुणांचा वापर करून समाज बळकटीसाठी एकत्र येऊन समाजाची उन्नती करावी.
पण आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली कि, आज समाजातील युवक हा समाजापासून दूर जात आहे, का? कुणास ठाऊक..! असे का होत आहे..! या मागे अनेक कारणे असावीत, पण मित्रांनो जर आपणच समाजातील समाजकार्याला हातभार नाही लावला तर आपला हा समाज पुढे कशी वाटचाल करणार..! आज जो ''वटवृक्षरुपी'' समाज आपल्या ज्येष्ठ समाज कार्यकर्त्यांनी लावला आहे. तो वाढविण्यासाठी युवाशक्तीची गरज आहे. कारण युवा म्हणजेच आजचा युवक आणि ''शक्ती'' म्हणजेच ''उर्जा'' जर हीच उर्जा कोठे तरी कमी पडली तर समाजाचा व युवा वर्गाचा विकास कसा साध्य होईल..!
तर मित्रांनो, आज आपल्या समाजाने ''युवामंच'' रुपी जी मशाल हाती घेतली आहे. ती मशाल कायम स्वरूपी पेटती ठेवण्यासाठी युवकांची व त्यांच्या अंगी असलेल्या उर्जेची नितांत गरज आहे. जर संपूर्ण युवाशक्तीची उर्जा एकत्र तर काय चमत्कार घडू शकतो हे आपण स्वतः अनुभवू शकता, म्हणजेच आपल्या अंगी असलेल्या कला गुणांचा, नवनवीन संकल्पनेचा, सुज्ञ बुद्धीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याच समाजबांधवांना कसा उपयोग होऊ शकतो. तसेच सर्व थरातील युवा वर्ग एकत्र आला तर त्याचा फायदा आपल्याच समाजबांधवांना आणि युवा वर्गाला सुद्धा होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या युवकाला तांत्रिक ज्ञान अवगत असेल तर ते ज्ञान तो आपल्याच समाजबांधवांना देऊ शकतो. तसेच नवीन काम किंवा नोकरी संदर्भात संधी चालून आली असल्यास तो आपल्याच समाज बांधवाला कळवू शकतो. अशा प्रकारे अनेक इतर फायदे होऊ शकतात हे लक्षात असू द्या.
आज युवामंच कार्यकारिणीने नवीन उपक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे ''युवामंच सात स्तंभ'' या उपक्रमामार्फत आम्ही आपल्याच समाजातील सर्व समाजबांधवांना तसेच तरुण युवक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत आहोत उदा. शैक्षणिक, तांत्रिक, नोकरी विषयक, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक विकास आणि इतर उपयुक्त व्यावसायिक माहितींवर लक्ष केंद्रित केलेले आहे.
या उपक्रमात आम्हाला खरी गरज आहे ती युवाशक्तीची. ''युवामंच'' ची संपूर्ण कार्यकारिणी आपणांस असे आव्हान करीत आहोत कि, युवक-युवतींनी बहुसंख्येने ''युवामंच'' मध्ये सामील व्हावे आणि युवामंच बळकट करून आम्ही राबविलेल्या उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा.
''बदल घडवायचा असेल, तर संघटीत व्हायलाच हवे'' हीच सध्या येणाऱ्या काळाची गरज आहे. जसे श्री. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जो विडा उचलला आहे, त्या मागे जी खरी शक्ती आहे, ती युवाशक्ती आणि त्याच युवाशक्तीची गरज आज आपल्या समाजाला आहे. संपूर्ण समाजबांधव एकत्र आल्यास एक नवीन क्रांती घडवू शकतो....!,
म्हणतातना, ''एकीचे बळ मिळते फळ''