एका ताम्हणात तांदूळ घेवून त्यावर सोन्याच्या अंगठीने प्रथम गणेश, इष्टदेवता कुलदेवता,ग्रामदेवता यांची नावे लिहिणे पाचवे नाव बालकाचे लिहून त्या ताम्हणाची पंचोपचार पूजा करावी. ते नाव बालकाच्या उजव्या कानात तीनदा सांगणे व नंतर भद्रं कर्णेभि: असे म्हणावे. (जन्मनक्षत्रावरून, राशीपरत्वे मुलाचे नावराशी नाव किंवा व्यावहारिक नाव ठेवतात )

निष्क्रमण संस्कार

साधारण महिनाभराने बाळाला घराबाहेर, देवळात नेणे.

अन्न प्राशन- उष्ठावण करण्यासाठी प्रतिपदा पौर्णिमा अष्टमी द्वादशी या तिथी वर्ज्य समजाव्यात. मुळ सात-आठ महिन्याचे झाले की त्याला तांदळाची ( तांदळाच्या रव्याची) खीर पाजतात. हळूहळू नरम भात भरवतात. त्यालाच उष्ठावण अथवा अन्न प्राशनकरणे म्हणतात.

जावळ काढणे

हा संस्कार मुलगा व मुलगी दोघांवर होणे आवश्यक आहे. कारण मूल गर्भात असताना वाढलेले वसा (चरबी ) युक्त केस आरोग्यदृष्ट्या उपकारक नसतात. जन्मापासून एक वर्षाचे आत जावळ काढले जाते, किंवा तीन वर्षापर्यंत केव्हाही सममासात योग्य दिवस पाहून जावळ काढावे मुलाची ताळू(टाळू) भरण्यासाठी तेल वापरतो तेलामुळे डोक्याला खवडा होण्याची भीती असते तेव्हा जन्मवेळचे केस काढणे महत्वाचे असते त्यामुळे डोक्यावर जावळ असेल तर ते निघून जाते, नवीन केसांचे नूतन केसांचे उगवण घट्ट व जोमदारपणे होते.

वाढदिवस

ज्याचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे त्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा वाढदिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पाश्शात्य पद्धतीनुसार केकवर मेणबत्त्या लावून त्या फुंकणे, हैप्पी बर्थ टू यु ,(हा जन्मदिवस तुला सुखाचा जावो ) असे टाळ्या वाजवीत म्हणणे या पद्धतीत आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची इच्छा व्यक्त होत नाही . तसेच मेणबत्त्या विझवून आपणाला अंधाराकडे जायचे नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे जायचे आहे. ' तमसो मां ज्योतिर्गमय' असे शास्त्र सांगते. म्हणून आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करणे, आपणा सर्वांच्या हिताचे कल्याणाचे आहे.

औक्षण करणे

वाढदिवसाचे दिवशी मुलाला अभ्यंग स्नान घालावे. नवीन कपडे परिधान करावेत रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर मुलाला बसवावे व घरातील जैष्ट स्त्रियांनी ओवाळावे. मुलाने जैष्टाना नम्रतेने नमस्कार करावा. जैष्टांनी मुलाला दीर्घायुष्याचा ......आयुरारोग्य प्राप्त होण्यासाठी प्रेमपूर्ण आशीर्वाद द्यावा . वाढदिवसाचे दिनी सूर्याला नमस्कार घालून उत्तम ते खालील मंत्र म्हणून मुलाला खाण्यास सांगावे.

सतिल गुड संमिश्र अन्जल्यर्धमित पय:|
मार्कडेयात वरलब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये ||
अशा रीतीने उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. दीर्घायुष्यासाठी अश्वत्थामा, बली,व्यास, हनुमान, बिभीषण,कृपाचार्य परशुराम हे सात व मार्कडेय असे आठ चिरंजीव सांगितले आहेत. आजही ते जीवित आहेत. अशा चिरंजीवांची प्रार्थना करून अपमृत्यू येवू नये अशी मागणी करावी.

प्रार्थना

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानाश्च बिभीशन: |
कृप: परशुरामश्च सप्तैते चीरजीविनी: ||
सप्तैतान संस्म्रेन्नित्य मार्कान्देयाम्ठास्तामम |
जीवेत वर्षशतं साग्रं अपमृत्यु विवर्जित : ||

असा हा विधी करून नंतर हौस मौज म्हणून आपापल्या शक्तीनुसार समारंभ साजरा करावा.