नवीन घरात गृहप्रवेशाच्या वेळी वास्तू-शांत विधी केला जातो. जरी वास्तुशांत विधी केला असला तरी वास्तूचे पावित्र्य अबाधित राहू शकत नाही. आजकाल स्त्रिया मासिक पाळीची बंधने पाळत नाहीत. त्यासाठी चौथ्या दिवशी सुस्नात होऊन एका भांड्यात पाणी घ्यावे. त्यात हळद-कुंकू व थोडे गोमुत्र घालावे. हातात तुळशीपत्र घेवून ते शुद्धोदक आपल्या राहत्या जागेत सर्व ठिकाणी सिंचन करावे. त्यामुळे वितोळ दोष दूर होतो.
वास्तुमधील इतर दोष दूर होऊन ती वास्तू पवित्र होऊन संसारात समृद्धी भरभराट प्राप्तीसाठी दर पौर्णिमेस व अमावस्येस घरातील कुटुंब प्रमुख व्यक्तीने सकाळी देवपूजा झाल्यावर ताम्हणात गंध, फुल, अक्षता, निरंजन उदबत्ती/धूप आदी साहित्याने राहत्या जागेचे चार कोपरे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य यांचे पूजन करावे. प्रथम आग्नेय कोपरयात तीन पळी पाणी घालावे त्यावर अक्षता गंध फुल वाहावे. अगरबत्तीने व निरांजनाने ओवाळावे असे अनुक्रमे चार कोप्र्यांचे पूजन करावे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा यामुळे तुमची वास्तू चिरकाल सामर्थ्यवान राहून ती सदैव तुमच्या कल्याणार्थ राहील. कधी कधी गोमुत्र मिळणे कठीण असते. अशा वेळी (शुद्धोदक) पाणी म्हणजे त्यात हळद कुंकू गंध फुल घालून ते पवित्र जल तुल्शीने घरात सिंचन केले तरी शुद्धता होते.
वास्तु दोषानिवारण्यासाठी - रोज दुपारी जेवणापूर्वी एका पानावर शिजवलेले अन्न पदार्थ वाढावेत व ते पान घराच्या खिडकीत गच्चीवर अशा योग्य ठिकाणी ठेवावे कावळ्याच्या रूपाने घरातील अतृप्त आत्मे अन्न ग्रहण करतात व संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. राहत्या वास्तूत घरात देवासामोत दिवाबत्ती करून रोज मारुती स्तोत्र/रामरक्षा/शिवस्तुती स्वतः म्हणावी किंवा मुलांना म्हणावयास सांगावी.
सर्व सिद्धी यंत्र - सोमवारी सकाळी स्नान-देवपूजा आटोपल्यानंतर एका जड सफेद कागदावर केशराने/अष्ट गंधाने बाजूचे यंत्र लिहावे. यंत्राची पूजा करावी. धूप-दीप दाखवावा. ओम नमो शिवाय मंत्राचा २१ सोमवार पवित्र मनाने व परोपकारी वृत्तीने या यंत्राचे पूजन करावे यंत्र सिद्धी झाल्यावर यश प्राप्त होईल. २१ सोमवार नंतर हे यंत्र चांदीच्या ताईतमध्ये ठेऊन ताईत जवळ बाळगावा.
वास्तुशांतीसाठी अदभूत यंत्र- आपण ज्या घरात खोलीत फ्लातमध्ये राहतो तेथे वास्तुदेवता वास करून असते. वास्तुदेवतेचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असतो ती त्या जागेची माताच असते. माता प्रसन्न राहावी.तिची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर उठवून घरात पूजेत ठेवावे किंवा दरवाजाच्या चौकटीवर ठोकून ठेवावे.वास्तुमाता/वास्तुदेवता तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. यंत्राचे नियमित पूजन करावे. धूप दाखवावा.