पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कोणतीही दिशा अशुभ नाही प्रत्येक दिशेचे ९ भाग करून आपण कोणत्या भागातुन घरा बाहेर पडतो तो भाग त्याचे फलित जाणून घ्या. आपला प्रवेश अयोग्य असल्यास प्रवेश द्वाराच्या तळाचा उंबरठा तांब्याच्या तारेने बांधून घ्यावा.
बाजूच्या आकृती मध्ये पहावे(तांब्याची तार)नवीन वास्तु अथवा भवन निर्माण करताना मुख प्रवेश अशा रीतीने काढावा.
- अग्निभय
- मुलींची संतती अधिक
- प्रचंड संपत्ती देणारा
- राजमान्यता
- क्रोध, संताप, अशातंता
- धर्मस्थान, संकल्प
- दुःख
- चोरी
- आर्थिकझळ
- हीन भावना
- संकुचित विचार
- समृद्धी
- धर्मराज अशुभ
- भय, कृतघ्नता
- धनहानी
- मुले अधिकार विषमता
- पुत्र संकट खर्चिक
- शत्रुत्व वाढवितो
- हानी
- आर्थिकवृद्धी
- महावेदांत उत्तम
- राजभय,सरकारकडून त्रास
- धनहानी, २४- आजारपण
- दुर्घटना, कारावास
- वैर
- सर्वगुण संपन्न
- सुखप्राप्ती
- संपत्ती वाढ
- पुत्राशी वैर
- मुलांना त्रास
- कॉर्नरप्रवेश वर्ज्य
वास्तू शास्त्राप्रमाणे आपल्या घराची रचना असेलच असे काही सांगता येत नाही. शास्त्राप्रमाणे अनेक दोष येऊ शकतात. काही वेळेस आपण मुळ रचना बदलू शकत नाही अशावेळेस आपण आपल्या घरात शुभ उर्जा प्रवाहित करावी.
- घर स्वच्छ व टापटीप असावे.
- प्रवेश दरवाजा बाहेरील भाग दररोज स्वच्छ करावा.
- उंबरठा पूजन करून,उंबरठ्या बाहेर रांगोळीच्या दोन समान रेषा संपूर्ण दरवाजाच्या लांबीच्या घालाव्यात.
- महिन्यातून दोन वेळा तरी दरवाजाला गोंड्याच्या फुलांचे तोरण बांधावे.
- पूजाघरात,नंदादीप लावावा,किंवा सकाळ,संध्याकाळ घंटानाद करत दीप लावावा,वातावरण सुगंधमय असावे.सायंकाळी रामरक्षा,मारुती स्त्रोत म्हणावीत.
- अग्नी (गॅस) प्रज्वलित करण्याआधी (सकाळी एकदाच) अग्नी देवतेचे स्मरण करून नमस्कार करावा. स्वयंपाक उत्तम होतो. व्यवस्थित पुरतो. अन्न वाया जात नाही.>
- शक्यतो भोजन एकत्र घ्यावे. भोजनानंतर काही वेळ सर्व कुटुंबाने एकत्र बसून एकमेकाशी सवांद करावेत.
- नेहमी सकारात्मक भावना ठेवावी. वाईट शब्दांचा उच्चार करू नये. वास्तू देवता आपल्या प्रत्येक शब्दाला तथास्तु म्हणत असते म्हणूनच चांगली इच्छा निर्माण करत इच्छा निर्माण झाली तरच कार्ये होते हा सृष्टीचा नियम आहे.
- घरातील प्रत्येकाने नेहमी स्वत:बरोबर इतरांचा विचार करावा. परोपकारासारखे कर्म नाही. आपल्याबद्दल कोणालाही भय वाटावे असे वागणे अजिबात नसावे,नेहमीच आपला आधार व आदर वाटावा असे वागले पाहिजे.
- निद्रा-झोप ही कर्माशी निगडीत आहे चुकुनही आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची काळजी घ्या. सदैव चांगले कर्म करा.पहा निद्रा सुख मिळते कि नाही. बिछान्यात आल्यावर परमेश्वराची प्रार्थना करा. आज माझ्या हातून झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा आणि उद्या चांगले कर्म हातून घडू दे अशी इच्छा प्रगट करा. निद्रा आपोआप तुम्हाला जवळ करेल मात्र पूर्वेकडे व दक्षिणेकडे डोके करून झोपा. दशाज्ञांचे आपण योग्य रीतीने पालन करा वास्तू सदैव तुम्हाला सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य बहाल करील.