लहान पणचे अनिर्बंध वर्तन सोडूनशील, दृढनिश्रय व शिस्त अंगी बाणून ज्ञान संपादन करणे, ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करणे हा व्रतबंध संस्काराचा प्रमुख हेतू आहे.यज्ञोपवीत धारण करण्याने वरील नियमांची आठवण सतत जागृत राहते. ऱल्ली हा विधीब्राम्हण, ठराविक क्षात्रजाती व वैश्यजाती यांच्या पुरताच मर्यादित आहे. पंचाल सुवर्णकार समाजास मौजीबंधन हा विधी करावाच लागतो. हा संस्कार मुलगा आठ वर्षाचा असतांना करणे चांगले. उपनयनासाठी मुलाला गुस्र्बल असावे. उपनयन संस्कारात अनेक उपविधी खालीलप्रमाणे असतात.

उदा.
  1. चौलकम - क्षौरकरणे
  2. वस्त्रधारण -नेसायचा पंचामानेशीगाठमारुननेसावा व अंगावरपांघरायचा पंचादोन्ही खांदयावरुन घ्यावा.
  3. अजिनधारण -बसण्यासाठी लेकरीचेआसनघेणे.
  4. यज्ञोपवीत धारण - यज्ञोपवीत म्हणजे जानवे. जानवे तीन पदरी असते. तीन पदरावरती नवेद व ब्रम्हगाठीवर अथर्व वेदाची स्थापना केली जाते. जानवे गळयात घालण्यापूर्वी सूर्याला दाखवावे. न्नंतर उजवा हात वर करून प्रथम हातात व नंतर गळयात घालावे.
  5. आचमनविधी - संध्याकर्मविधी
  6. प्रधनाज्य होम
  7. अवक्षारणविधी - सूर्यदेवाची कृपाव्हावीम्हणूनअवक्षारणविधीकेलाजातो.
  8. विभूतिग्रहण
  9. गायञीउपदेश
  10. मेखलाधारण
  11. दंडधारण– पळसाचा दंड (बटूच्या मस्तकाइतकीउंचीचीकाठी)
  12. आचारबोध
  13. अनुप्रवचनीयहोम.
  14. मेधाजनन: हाविधीस्मरण, ग्रहण व धारण वाढविण्यासाठी केला जातो.
  15. भिक्षाग्रहण- ओमभवतिभिक्षांदेही ! चातुर्वेदान षटशात्राणि अष्टादश पुराणनि पठीता भवामि || आई, मला भिक्षा दे मी चार वेद सहाशास्त्रे, अठरा पुराणे यांचे अध्ययन करणार आहे. असे म्हणून भिक्षा मागावी.
  16. भोजनविधी- मौजीबंधन झालेल्या भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी करण्यास येणारा विधी पात्रा भोवती पाणी फिरवावे. पात्राच्या उजव्या बाजूस खालून वरच्या दिशेस भाताच्या छोटया पाच आहुती दयाव्यात. आहुत्या देताना चित्राय स्वाहा| चित्रगुप्ताय स्वाहा | यमाय स्वाहा | यामधार्मय स्वाहा | सर्वेभ्योभूतेभ्याःस्वाहा | हे पाच मंत्र म्हणावेत. नंतर उजव्या हाताने आहुत्या वरून खाली गोळा कराव्यात. डाव्या हाताने हातावर थोडे पाणी घालून हात धुतल्यासारखा करावा. पात्रावर डाव्या हातावर उजवा हात पालथा धरून अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिना देहामाश्रितः | प्राणापान सामायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम || हा श्लोक म्हणावा. नंतर "अमृतोपास्तानमासि" हा मंत्र म्हणत आचमन घ्यावे. नंतर प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा | व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा | समानाय स्वाहा | ब्राम्हणे स्वाहा | ह्या मंत्रांनी भाताच्या सहा प्राणायुती मुखात घ्याव्यात. डाव्या हाताच्या बोटाने थोडे पाणी डोळ्याला लावावे. नंतर भोजनास सुरुवात करावी. भोजन झाल्यावर डाव्या हाताने एक पळी पाणी उजव्या हातात घेऊन "अमृतोपास्तानमासि" | असे म्हणून आपोष्णी घ्यावी.

समावर्तन: सोडमुंज: ब्राम्हच्र्याश्रामातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी समावर्तन-सोडमुंज संस्कार करण्यात येतो हल्ली मुंजीनंतर लगेच सोडमुंज करण्याची प्रथा निर्माण झाली आहे हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित आहे.