संत नरहरी महाराजांचा जन्म शके 1235 साली (इ.स.1313) पंढरपूर येथेच झाला. पंढरपूर हे शिवोपासकांचे प्राचीन केंद्र होते. परंतु थोर शिवभक्त पुंडलिकाला त्यांची मातृपितृभक्ती पाहून भेटायला आलेले भगवान श्रीकृष्णाला पांडुरंगाच्या रुपात अठठ्वीस युगे कमरेवर हात ठेवून रहावे लागले.
पंढरपूरचा एक धनाढय सावकार पांडुरंगाच्या कृपेने अनेक वर्षानी पुत्ररत्नाचा लाभ झाल्यामुळे सोन्याचा करगोटा करण्यासाठी कुशल कारागीर म्हणून नावलौकिक असणा-या नरहरी सोनारांकडे आले.
संत नरहरींना त्यांनी करगोटा बनवावा म्हणून इच्छा प्रकट केली. पण सोनारांनी सांगितले की मी शिवालयाशिवाय अन्य कोणत्याही देवालयात जात नसल्याचे सांगितले. सावकाराला मोठा पेच पडला. मात्र करगोटा तर नरहरी महाराजांकडुनच घ्यावयाचा निश्चय केला व एक युक्ती काढली. सोनारांना विठोबाच्या कमरेचे माप आणुन धायचे कबूल केले. सावकारांना दिलेल्या मापाप्रमाणे नरहरी सोनारांनी आपल सारं कौशल्य पणाला लावून हिरे, माणिक, मोती जडवून सावकाराने आपल्या वैभवाला शोभेल अशा डामडौलात विठठ्लाची महापूजा, अभिषेक एकादशीच्या मुहूर्तावर करुन करगोटा कमरेला बांधू लागले. प्रत्यक्षात करगोटा चार बोटे मोठा झालेला होता. सावकाराला या गोष्टीचा रागच आला. नरहरी बुवांनी हे मुददामच केल असेल ना? अशी शंका आली. मात्र सोनार कितीही एकनिष्ठ शिवभक्त असले तरी मनाचा दुष्ट खोटेपणा दाखवतील असे देखील वाटत नव्हते. सावकारान मनातील सर्व शंका बाजुला ठेवून पुन्हा नरहरी सोनारांकडून करगोटा चार बोटे कमी करुन घेतला. कमी केलेला करगोटा चार बोटे कमी पडू लागला. सावकारही वैतागले. नरहरींना सावकाराची अवस्था पाहून वाईट वाटले. आपल्या हातून कसूर झालीच नाही मग हे असं का व्हावा. काहीतरी विधी खेळेत निराळा असला पाहिजे.
नाविण्यास्तव नरहरींनी सावकारांना सांगितले की तुम्ही माझे डोळेे बांधून देवालयात न्या झालं, नरहरींनी मोजकी हत्यारे बरोबर घेतली व डोळयांवर पटटी् बांधून चालले. पांडुरंगाच्या देवालयाच्या वाटेनं पाहणा-यांना विश्वासच बसत नव्हता. काहीतरी अघटीत घडणार हया कल्पनेने अनेकजण पांडुरंगाच्या देवालयात गर्दी करु लागले. सावकार व पुजा-यांनी नरहरींना हाताला धरुन गाभ-यात आणलं. विठोबासमोर उभ केल असता नरहरी दोन्ही हातांनी विठोबाच्या कमरेला करगोटा गुंडाळू लागले तोच त्यांना काहीतरी निराळेच जाणवू लागले. विठोबाच्या कमरेवर हात नव्हते. माञ कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेलं त्यांना स्पष्ट जाणवलं. त्यांच्या हातांना कंप सुटला. त्यांनी मुर्तीवर हात फिरवला तेव्हा एका हातात कमंडलू जाणवली व दुसऱ्या हातात त्रिशूल जाणवले. त्यांचा हात थरथरुन गळयाजवळ गेला असता सर्पाचे भूषण जाणवले . लगेच ते ओरडले छे छे हा विठठ्रल कसला? साक्षात शिवशंकर दिसतोय. नरहरीबुवांनी कंपपावणाऱ्या हातांनी डोळयावरील उपरणं सोडलं आणि पाहतात तो काय चमत्कार! साक्षात पांडुरंगाच्या मुर्तीचेच दर्शन!
नरहरींनी पुन्हा डोळे बांधून घेतले, पुन्हा तोच चमत्कार हाताला व्याघ्रचर्म, ञिशूल, कमंडलू , सर्पभूषण, नरहरींच्या सर्व अंगाला कंप सुटला व दरदरुन घाम आला. जणू घामाच्या रुपाने त्यांच्या अहंकार विरघळून गेला व नरहरींनी डोळयांवरील उपरण काढलं. समोरील मुर्तीला शांत नजरेने न्याहळले. मुर्तीमंत विठठ्रल त्यांचा समोर कमरेवर हात ठेवून उभे होते. त्यांनी आपादमस्तक पासून त्याला न्याहाळलं. विठठ्रलाच्या मस्तकावरील शिवलिंगाचं दर्शन झालं आणि डोळयात लख्ख प्रकाश पडला अखंड विश्वात एकच परमाला सामावलेला आणि तेच श्रीराम, श्रीविठठ्रल, श्रीकृष्ण व श्रीशिव अशा विविध नावांनी साकारलेलं आहे. या अदभूत नरहरींच्या मनातील हरी हर भेदभाव नाहिसा झाला आणि हि घटना पंढरपूरातील मंडळींच्या कानावर गेली.
सातशे वर्षांपूर्वी संतांनी लावलेला हा वारकरी संप्रदायाचा वेल आज गगनावरी गेला आहे. सातशे वर्षे फुलूनही याचा सुगंध आजही तितकाच बहरत आहे. भक्तीफुलांचा हा दरवळ संत साहित्यातून आजही रंग, रुप, वास, रस, गंध, स्पर्श यांची बरसात करतो आहे, हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात फार मोठे स्थित्यंतर घडवून आणणारी घटना होय. त्यामुळे धार्मिक जीवन समृदध झाले व महाराष्ट्रातील लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले.