प्रथम ब्रम्ह निर्माण झाले ब्रम्हातून सृष्टी निर्माण झाली.पण हि सृष्टी आधारहीन होती तेव्हा परब्रम्हाने आठ दिशांची निर्मिती करून सृष्टीला आधार दिला व ह्या आठ दिशांचे आठ रक्षक म्हणून ग्रहांच्या रूपाने आठ पालकांची व्यवस्था केली. आपण त्यांना अष्टपाल म्हणतो हे आठ दिशांनी सृष्टीचे रक्षण करतात. संपूर्ण जग, जगामध्ये आशियाखंड, त्यात भारत देश, भारतात महाराष्ट्र राज्य, त्यात अनेक जिल्हे, तालुके, गाव व एक वाडा इथपर्यंत सर्व दिशा व दिशांचे रक्षक सर्वत्र समान, घटबिंब दृष्टांतानुसार छोट्याशा जागेत सुद्धा आठ दिशांचे आठ पालक व दिशा हि कुठेही बदलत नाहीत. होकायंत्र वापरून आपल्या वास्तु- -च्या दिशा नक्की करा व त्यानुसार प्रत्येक दिशेचा पालक स्वामी यांची ओळख करून घ्या. प्रत्येक वास्तुमधील पाच तत्वांची ओळख करून घ्या. वास्तुच्या रचनेचे शास्त्र आपोआप उमगेल व अतिशय समृद्ध वास्तु अथवा आपले घर आपण स्वत: शास्त्रानुसार मांडू शकता पुढे दिलेल्या काही तक्त्यांचा उपयोग केल्यास परिपूर्ण वास्तु, गृहसौख्य उपभोगता येईल. संस्कृतीपूजन भाग १ मध्ये वास्तुरचना कशी करावी परिपूर्णपणे मांडलेली आहे. आता काही तक्त्यांचा अभ्यास करून आपल्या विचारांना चालना दया स्वत: नविन आधुनिक वास्तु शास्त्र शिका.
- अष्टदिशा व पालक ग्रह
बाजुच्या आकृतीवर दृष्टि टाकल्यास आपल्या लक्षात येते दोन सीमेवर हवे हवे से वाटणारे पालक ग्रह उभे आहेत. तर दोन सिमेवर असे पालक उभे आहेत कि ज्यांचे नाव घेताच नको नको म्हणावेसे वाटते, मग लक्षात घ्या ज्यांनी वास्तुत प्रवेश करावा असे पालक पूर्व व उत्तर दिशेला जागा मोकळी सोडा त्यांना आत येऊ दया आणि पश्चिम व दक्षिण ह्या ठिकाणी उंच जड सामानाची व्यवस्था करा. वास्तूमध्ये वास्तू पुरुषाच्या रचनेमध्ये ईशान्येला डोके म्हणून ईशान्य मोकळी सोडावी. दोन हात पूर्व व उत्तर हे चांगले कर्म करण्यासाठी मोकळे रहावेत. आपल्या शरिराचे वजन आपण आपल्या पायावर पेलतो म्हणून पश्चिम व दक्षिण ह्या दिशांना जड सामानाची व्यवस्था करावी. वास्तूचे ब्रम्ह स्थान हे वास्तू पुरुषाची नाभी ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वजन येता कामा नये.
- पंचतत्व
प्रत्येक तत्व आपआपल्या जागी असले म्हणजे निरोगी वास्तूचे सुख लाभते. अन्यथा वास्तू दोष निर्माण होतो. कोणतेही तत्व जेथे जितके हवे तितकेच प्रमाणापेक्षा जास्त असू नये.
- वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या आतील रचना कशी असावी.
पाहुणे, मुली, नवविवाहित यांचे शयन कक्ष. पर्यायी स्वंयपाकगृह विहीर, अथवा उंच नसावे. जास्तीत जास्त मोकळी जागा. तिजोरी ठेवण्याचे कक्ष उत्तराभिमुख वयोवृधांची व्यवस्था स्नानगृह. देवघर, पुजाघर, गृहप्रवेश, अध्ययन जमिनीखाली पाणी साठविण्याची जागा स्वंयपाक घर व स्वच्छतागृह नसावे.
पश्चिम मुलांचे शयनकक्ष अध्ययन जड सामानाची कपाटे उंचावर पाणी ठेवण्याची जागा. वास्तूचे ब्रम्हस्थान जास्तीत जास्त मोकळे असावे. मोकळी जागा प्रवेश मुलासाठी रूम बैठक.स्नानगृह. पूर्व मालकाचे शयनगृह जड समान, कपाटे,उंचावर पाणी ठेवण्याची जागा. तळघर खड्डा नसावा. वरच्या मजल्यावर जाणे साठी मार्ग,स्वछतागृह,जड सामानाची व्यवस्था शयनकक्ष स्वंयपाकगृह पूर्वाभिमुख विजेचे मिटर, स्वछतागृह जमिनीखाली पाणी विहीर नसावे.