वास्तुशांती विधी मध्ये वस्तू प्रतिमेचे विधिवत शास्त्रोक्त पूजन केले असता जीवन सफल होते. अखंड कल्याण होते.
वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने वरदान दिले आहे. जो कोणी मानव, नवीन वास्तूची वास्तुशांत करताना तुला तुना बळीभाग अन्न म्हणून देईल त्या वास्तू धारकाला व कुटुंबाला अपार सुख समृद्धी व ऐश्वर्य दे, चांगले आरोग्य व दीर्घायुष्य दे त्यांना शांत व समाधानी ठेव. पंचधातू, पंचरत्न, वास्तुपुरुषाची प्रतिमा, गंधफूल, अक्षता, आठ प्रकारची धान्ये, नदीचे शेवाळे, दहीभात नैवेद्य, ह्या सर्व वस्तू वास्तूच्या अग्नेय मध्ये (पूर्व अग्नेय )निक्षेप ( जमिनीत पुरावे ) करावे.
पंचरत्न-
सूर्य (माणिक), चंद्र (मोती), मंगल (पोवळ), बुध (पाचू), गुरु (पुष्कराज), पंचधातू-सोन, चांदी, तांब, शीस, लोखंड हे पाचरत्न व पाचधातू वास्तूचा १) आत्मा २) मन ३) कार्य ४) ज्ञान ५) कर्माचे प्रतिक आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीर हे ब्रम्हांडाची प्रतिकृती आहे. वास्तू हे जस पंचतत्वाच प्रतिक आहेत. तसेच मानवपिंड हा सुद्धा पंचतत्वापासूनच निर्माण झालेला आहे. म्हणूनच घर स्वच्छ - मन स्वच्छ, घर सुंदर, त्याचे विचार सुंदर म्हणूनच वास्तू मध्ये सुखशांती लाभण्यासाठी आपण वास्त देवतांची उपासना करावी.