विश्वकर्मा सुवर्णकार समाज, मुंबई

देव, ब्राम्हण व अतिथी यांच्या साक्षीने वधू पिता वर पित्यास नियोजित वरासाठी वधूचा स्वीकार करण्याची प्रार्थना करतो, वर पिता त्या कन्येचा वधू म्हणून स्वीकारण्याचा मनोदय जाहीर करतो. तसे वचन देतो यालाच वाड:निश्चय (वाग्दान विधी ) म्हणतात व सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी साखर वाटली जाते म्हणून साखरपुडा असेही म्हणतात. ब्राम्हविवाह विधीचा प्रारंभ वाड:निश्चयाने होतो म्हणजे पूर्वी विवाहाचे पूर्व रात्री किंवा सकाळीच हा विधी करत असत. सध्या हा विधी विवाहापूर्वी उभयपक्षांना सोयीस्कर व शुभ मुहूर्तावर केला जातो. साखरपुडा हा विधी वधू गृही होतो किंवा वधू पक्षाकडून हाँल घेऊन साजरा केला जातो.

साखरपुडा विधीस लागणारे साहित्य

वधू पक्षाकडून: सहा पाट, पाटावर आसन, समई, निरंजन, घंटी, दोन पळी भांडी, दोन ताम्हणे, दोन तांब्याचे तांबे, तबक, ताटे, उपरणे , टोपी, गंध (अष्टगंध / गंधगोळी ) अक्षता, हळद, पिंजर, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, गूळखोबरे, उदबत्या, वातीसाठी कापूस, तेल, तूप, विड्याची पाने ५० (साक्षी विडे वाटण्यासाठी पाने-सुपारी कातरलेली ) अखंड सुपाऱ्या २०, पाच नारळ, आंब्याचे टहाले, तांदूळ १/२ कि. वाटीभर साखर, सुटे पैसे, फळे पूजेसाठी.

वर पक्षाकडून: ओटीचे सामान, बदाम, खारीक, अक्रोड, सुपाऱ्या, हळकुंडे प्रत्येकी पांच ओटीसाठी पाच प्रकारची फळे, तांदूळ किंवा गहू, साडी-चोळी, अंगठी, पेढ्यांचा पुडा, विड्याची पाने ओ सुपारी (साक्षी विडे वाटण्यासाठी) साखरपुडा विधीस सुरुवात करण्यापूर्वी खाली दाखविल्याप्रमाणे मांडणी करावी. वधू आणि वरपित्याने पोशाख करून डोक्यावर टोपी, अंगावर उपरणे घेऊन वाड:निश्चय विधीस बसण्यापूर्वी तयार व्हावे.

वधू: वर माता-पिता उभंयता विधीसाठी बसतात किंवा फक्त वधू-वर यांचे पिता (पालक) विधीसाठी बसतात. कलश म्हणून तांब्याचा तांब्या घेऊन त्यात पाणी भरावे, तांब्याला हळद, पिंजर प्रत्येकी पाच बोटे ओढवीत. कलशावर आंब्याच्या पानाचे तहाळे किंवा पाच नागवेलीची पाने ठेवून त्यावर सोललेला नारळ ठेवा. साखरपुडा विधी घरी असल्यास घराच्या देवाजवळ उदबत्ती लावावी तसेच तुळशीपाशी पानाचा विडा ठेऊन यजमान- उभयतांनी त्यावर हळद-पिंजर अक्षता वाहून कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यावा. हॉ लवर विधी असल्यास हॉलमध्ये येण्यापूर्वी उपरोक्त विधी करावा.

साखरपुडा विधीस सुरुवात: वाड:निश्चय विधीस उपस्थित वरिष्ट मंडळीना यजमानांनी नमस्कार करून वाड:निश्चय विधीला सुरुवात करत आहे असे नम्रतापूर्वक सांगावे दोन्ही यजमानांनी स्वत:च्या भली कुंकूम टिळक लावावा. (अत्यंत लहान आवाजात मंगल स्वरात सनईची ध्वनिफीत लावावी.) संध्या वंदन सुरुवात ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः | असे म्हणत तीन वेळा आचमन करावे. ॐ गोविंदाय नमः | असे म्हणून उजव्या हाताने पळीभर पाणी ताम्हनात सोडावे. नंतर हात जोडून

विष्णवे नमः| मधुसुदनाय नमः| त्रिविक्रमाय नमः| वामनाय नमः| श्रीधराय नमः| हृषीकेशाय नमः| पद्मनाभाय नमः| दामोदराय नमः| संकर्षानाय नमः| वासुदेवाय नमः| प्रद्युम्नाय नमः| अनिरुधाय नमः| पुरुषोत्तमाय नमः| अधोक्षजाय नमः| नारसिंहाय नमः| अच्युताय नमः| जनार्दनाय नमः| उपेंद्राय नमः| हरये नमः| श्रीकृष्णाय नमः|
उजव्या हातात अक्षता घेऊन गणपतीचे स्मरण करावे.
वक्रतुंड महाकाय | सूर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्ये षु सर्वदा ||
असे म्हणून अक्षता गणपतीवर वाहाव्यात. हातात अक्षता घेऊन हात जोडून कुलदेवतेचे स्मरण करावे.

नमो देव्यै शिवायै सततं नमः|
नमः प्रकृत्यै भद्राये नियताः प्रणताः स्म् ताम् ||

असे म्हणून पहिल्या विड्यावर अक्षता वाहणे. सुवासिनीने हळद पिंजर वाहावी, नमस्कार करावा.

क्षेत्रपालाचे स्मरण करावे. जागेचा रखवालदार यासाठी श्रीफळ, पानाचा विडा पाटाच्या बाजूला मांडून ठेवलेला आहे. त्यावर अक्षता वहाव्यात शुभकार्याप्रसंगी क्षेत्रपालाचे स्मरण करून शुभकार्यासाठी आशीर्वाद मागावा. रक्षण असावे म्हणून प्रार्थना करावी. हातात अक्षता घेऊन देवादिकांना वंदन करावे |

श्री महागणाधीपतये नमः| श्री गुरुभ्यो नमः| सरस्वत्यै नमः| इष्टदेवताभ्यो नमः| कुलदेवताभ्यो नमः| स्थानदेवताभ्यो नमः| वास्तुदेवताभ्यो नमः| वाणीहीरण्यगर्भाभ्यां नमः| श्रीलक्ष्मिनारायणाभ्यां नमः| शचीपुरन्दराभ्यां नमः| उमामहेश्वराभ्यां नमः| मातापितृभ्यां नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमः | सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः |

अविघ्नमस्तु । सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णक।
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप ।।1।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन।
व्दादशैतानी नामानी य पठेच्छृणुयादपि ।।2।।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।3।।
शुक्लांबर धरं देवं शशिवर्ण , चतुर्भुजम् प्रसन्नवदनंध्यायेत सर्वविघ्नोपशांतये ।।4।। सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तु ते ।।5।।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमंगलम् ।
येषां हदिस्थो भगवान् मगलायतनं हरि ।।6।।
तदेव लग्नं सुदिनं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामी।।7।।
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय ।
येषामिन्दिवरश्यामो हदयस्थो जनार्दन।।8।।
विनायकं गुरं भानुं ब्रम्हाविष्णूमहेश्र्वारान्।
सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये ।।9।।
अभिस्पितार्थसिद्धयर्थ पूजितो य सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपये नम।।10।।
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्र्वराः।
देवा दिशन्तु न सिद्धिं ब्रम्हेशानजनार्दनाः ।।11।।

असे म्हणून समोरील पानाचे विडे , कलश, गणपती यावर अक्षता वहाव्यात. पुन्हा हात जोडून श्री मदभग्वतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया, प्रवर्तमानस्य शालिवाहन शके अमुक नाम संवस्तरे, अमुक मासे, अमुक पक्षे, अमुक तिथी, अमुक दिवस नक्षत्रे शुभ नाम योगे शुभकरणे वर्तमाने एवं गुण- विशेषण- विशिष्टाया , शुभ पुण्यतिथी, मम आत्मनः , सकलशास्त्र पुराणोत्क, फलप्राप्त्यर्थ, अस्माकं, सकलकुटुंबाना, क्षेम , स्थैर्य-आयुरारोग्य - ऐश्वर्य, पाप्त्यर्थ, सकल पिडा परिहारार्थ , सकल मनोरथ सिद्धयर्थम प्रजापती देवता पित्यर्थ

संकल्प: मम अमुक नाम्न्या कन्यकाया : करिष्यमाण विवाहांग भूतं वाग्दांन ( ताम्हणात उजव्या हाताच्या बोटावरून उदक सोडावे तसेच निर्विघ्नार्थ गणपतीपूजन , वरुण पूजनच करिष्ये | असे म्हणून दोघांनी ताम्हणात उदक सोडावे.

गणपती पूजन - श्री मन्महागणपतये नमः| आवाहनार्थे अक्षता समर्पयामि| गणपतीवर अक्षता वहाव्यात.

श्री मन्महागणपतये नमः| आसनार्थे अक्षतान समर्पयामि| आसनासाठी देवावर अक्षता वहाव्यात.
श्री मन्महागणपतये नमः| पादयो पाद्यं समर्पयामि | डाव्या हातात पळीत पाणी घेऊन दुर्वेने/फुलाने देवावर पाणी शिंपडावे.
श्री मन्महागणपतये नमः| शुद्धोदक स्नानं समर्पयामि| पुन्हा दुर्वेने/फुलाने पाणी शिंपडावे.
श्री मन्महागणपतये नमः| विलेपनार्थे चंदन समर्पयामि| अनामिकेने (करंगळीजवळचे बोट) देवाला गंध लावावे.
श्री मन्महागणपतये नम। अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। देवाला अलंकारासाठी अक्षता वहाव्यात.
ऋद्धि सिद्धिभ्यां नम। हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। ऋद्धि सिद्धि देवतांना हळद-पिंजर वाहणे.
श्री मन्महागणपतये नम। दुर्वाकुरान सर्मपयामि। देवाला दुर्वांची जुडी,गंध,अक्षता,हळद-पिंजर यांच्यासह वाहणे.
श्री मन्महागणपतये नम। पूजार्थे काळोद्भव पुष्पम सर्मपयामि। देवाला फुल वाहणे(लाल रंगाचे असेल तर उत्तम)
श्री मन्महागणपतये नम। धूप सर्मपयामि। दिपं सर्मपयामि। उजव्या हाताने प्रथम उदबत्ती व निरंजन ओवाळणे. डाव्या हाताने घंटा वाजवावी.

श्री मन्महागणपतये नम। नैवेदयम सर्मपयामि। देवाच्या समोर ठेवलेल्या गुळ खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा.
प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। उदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ब्रम्हणे स्वाहा।

असे म्हणून तीन वेळा ताम्हणात पाणि सोडावे आणि देवाला गंध फूल वहाणे. पाटावर ठेवलेल्या विडयावर पाणि सोडावे. देवाला गंध फूल वाहून नमस्कार करावा व हात जोडून प्रार्थना करावी. अनेन कृतपूजनेन श्री. महागणपती प्रियतां न मम।

सूचना: वधूला सुवासिनीच्या हस्ते (भावी सासूने भावी सुनेला) हळद पिंजर लावून तिच्या हातात साडी चोळी-वेणी द्यावी. वधूने देव, ब्राम्हण व वर माता-पिता यांना नमस्कार करुन साडी परिधान करण्यासाठी जावे. यजमानाने दिपपूजन, घंटापूजन, कलशपूजन, कुळदेवता, ग्रामदेवता ईष्टदेवता यांचे पूजन करावे.

कलश पूजन: प्रथम दोन्ही हात कलशावर धरुन कलशाची प्रार्थना करावी.

कलशस्य मुखे विष्णुःकंठे रुद्रसमाश्रित।
मूले तत्र स्थितो ब्रम्हा मध्ये मातृगणाःस्मृताः।।
कुक्षौ तु सागराःसर्वे सप्तदीपा वसुंधरा।
ऋग्वेदोथ यजुर्वेदसामवेदो ह्यथर्वर्ण।।
अंगेश्र्च संहिताःसर्वे कलशं तु समाश्रित।
अन्न गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा।
आयांतु देवपार्थ दुरित क्षयकारकाः।।
गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन संनिधिं कुरु।।
कलश देवताभ्यो नम।

असे म्हणून कलशात अख्खी सुपारी व 1रु. ठेवणे. कलशात गंध,अक्षता,हळद,कुंकू लावणे. तुळशीचे पान/दुर्वा/फुल कलशात ठेवावे. आंब्याचा टहाळा किंवा खायची पाने कलशाच्या मुखावर ठेवावी.

अस्मिन कलशे वरुणाय नम। वरुण देवता आवाह्यामि।

असे म्हणून कलशात अक्षता वाहणे. त्यानंतर नारळाची शेंडी वर करुन नारळ कलशाच्या मुखावर आंब्याच्या टहाळयावर किंवा नागवेलीच्या पाच पानावर ठेवावा. (गणेशपूजनाप्रमाणे आवाहनापासून प्रार्थनेपर्यंत विधी करावा. श्री. मन्महागणपतये नम असे म्हणावे.)

वाग्दविधी: वधू पित्याने १ मुठभर तांदूळ,हळकुंड ,सुपारी उजव्या हातात घेऊन म्हणावे वाचा दत्ता माया कन्या,पुत्रार्थ स्वीकृता त्वया /कान्यावलोकन विधो निश्चतसत्व सुखी भव//असे म्हणून हातातील तांदूळ,हळकुंड,सुपारी वर पित्याच्या उपरण्यात द्यावेत व गाठी मारावी.नंतर वर पित्याने मुठभर तांदूळ हळकुंड सुपारी उजव्या हातात घेऊन म्हणावे वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीकृत मया/ वरावलोकन विधो, निश्चतसत्व सुखी भव//

अमुक गोत्रातील अमक्याचा मुलगा ची.---- यासाठी वधू म्हणून अमुक गोत्रातील अमक्याची मुलगी ची.सौ का.----- हिचा स्वीकार करत आहे.असे म्हणून हातातील तांदूळ,हळकुंड,सुपारी वधू पित्याच्या उपरण्यात देऊन गाठ मारावी.वधू/वर-पिता देव,ब्राम्हण व अथीथी यांच्या साक्षीने वाचन बाधा होणे हाच वाद निश्चय होय.येथे दोघांच्या गोत्राचा उच्चार (सर्वांसमोर होतो)तांदूळ,हळकुंड व सुपारी उपरण्यात गाठ मारलेले दोन्ही पाटावर ठेऊन गाठीवर हळद,पिंजर अक्षता वाहून त्यावर कलशातील पाणी तुल्शिपात्राने शिंपडावे व म्हणावे
शिवा आप:संतु | सौमनस्यमस्तू | अक्षत चास्तु |
दीर्घमायु : श्रेय ; शांती पुष्टीस्तुष्टीश्र्चास्तु | एतद्व : सत्यमस्तु ||

(नव परिणीत वधूला दीर्घ आयु व सुखी वैवाहिक जीवन यासाठी परमेश्वराला प्राथना करणे)
हे तांदूळ आपल्याजवळ ठेवून विवाहाच्या वेळी वाताव्याच्या अक्षतामध्ये मिसळावे .

सासरहून आलेली साडी परिधान करून वधू आली कि तिला मत-पित्य शेजारी बसवावे.मुलीला हळद पिंजर लावून वचन पुरती झालेली असते,मग वरपक्षाकडील ५ सवासिनी मुलीची ओटी भरतात व ओवाळतात .

सूचना: वाडनिश्चय होऊन ची सौ.का.म्हणजे सौभाग्याची कांश करणारी असी होणारी वधूची प्रथमच ओटी भरली जाते.असा विधी संस्कार दुसर्या इतर धर्मात नाही.ह्याचे महत्व लक्षात घेऊन साखरपुढा वाडनिश्चय विधी होऊन लग्न मोडणे दोघानाही अतिशय वाईट असते.असा घोर अपराध करणाऱ्यास ईश्वर कधीच माफ करणार नाही.साखरपुढा विधी झाल्यावर लग्न मोडणे हे समाज्विघ्तक,शास्त्रबाह्य कृत्य आहे.

वधू वरांनी गणेशपूजन अरुण पूजन करावे.नमस्कार करावा.वधू पिता वरचे पूजन करून वराला भेटवस्तू (वस्त्र)देतो.वर वधूच्या बोटात अंगठी घालतो.वधू-वर एकमेकास पेढा भरीवतात. असे म्हणून यजमानांनी गणपती व वरून देवतांना अक्षता वाहून विसर्जन करावे.व्याही भेट:दोघे व्याही एकमेकांच्या कपाळाला पिंजर,अक्षता लावून पानाचा विडा व नारळ देऊन ठेवतात.अतिठीना नम्रता पूर्वक नमस्कार करून हे शुभकार्य सिद्धीस जाण्यासाठी सर्वाना सहकार्याची प्रार्थना करतात. दोन्ही यजमानांनी ब्राम्हणास गंध अक्षता लावून पूजन करून दक्षिणा देऊन नमस्कार करावा.यजमान साक्षी विडे वाटण्याचे काम करतात.नंतर आलेल्या मंडळीस चहापान कार्यक्रम अशा रीतीने साखेर्पुधा विधीची सांगता होते.